वडगाव मावळ – मावळ तालुक्यातील महसूल मंडळांची पुनर्रचना करण्यात आली आहे. यामुळे तालुक्यात याआधी असलेल्या ७ महसूल मंडळांमध्ये वडेश्वर, परंदवडी, टाकवे बुद्रुक, टाकवे खुर्द व कुसगाव बुद्रुक हे ५ नवीन महसूल मंडळ वाढले आहेत. त्यामुळे तालुक्यातील महसूल मंडळांची संख्या दुपटीने वाढली असून, आता तालुक्यात १२ महसूल मंडळ असणार आहेत, अशी माहिती तहसीलदार विक्रम देशमुख यांनी दिली.
अधिकाऱ्यांवरील कामाचा ताण कमी होणार
मावळ तालुक्यात याआधी वडगाव मावळ, तळेगाव दाभाडे, खडकाळा, काले, शिवणे, कार्ला व लोणावळा अशी ७ महसूल मंडळ कार्यरत होती. या सात मंडळांच्या अंतर्गत ७१ सजांचा कारभार चालत होता. दरम्यान, दि. १५ फेब्रुवारी २०१८ रोजी तत्कालीन जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी आदेश काढला होता. या अंतिम अधिसूचनेनुसार तब्बल ६ वर्षांनी ही कार्यवाही झाली आहे. दरम्यान, मंडल अधिकारी कार्यालयांचे विभाजन होऊन विस्तारीकरण झाल्यामुळे मंडल अधिकाऱ्यांवर असणारा कामाचा ताण कमी होणार आहे. मावळ तालुक्यातील नागरिकांना मंडल अधिकारी कार्यालय आपल्याजवळ आल्याने सोयीचे होणार आहे. संबंधित नवीन महसूल मंडळांसाठी मंडल अधिकाऱ्यांचीही नेमणूक करण्यात आली असून लवकरच प्रत्यक्ष कामकाजाला सुरुवात होणार आहे.
मंडल व समाविष्ट सजा पुढीलप्रमाणे
वडगाव मावळ: वडगाव, कातवी, नवलाख उंबरे, बधलवाडी, आंबळे, निगडे
तळेगाव दाभाडे : तळेगाव, वराळे, आंबी, इंदोरी, सोमाटणे ■ खडकाळा : खडकाळा, कुसगावर्द, कान्हे, नायगाव, जांभूळ, साते
कार्ला : कार्ला, बेहेरगाव, माळवली, ढि खुर्द, ताजे • काले, मोरवे, चावसर, दुधीवरे, शिळींब, जोवण, कोथूर्णे, करुंज
लोणावळा : लोणावळा, खंडाळा, कुणे नामा, उढेवाडी, कुरवंडे, भुशी • शिवणे: शिवणे, चांदखेड, दिवड, बौर, शिवली, करूंज, आढले बुद्रुक
वडेश्वर (नवीन): वडेश्वर, नागथली, क्षेत्र, खांड, किवळे, इंगळून, माळेगाव बुद्रुक टाकवे बुद्रुक (नवीन) टाकवे बुद्रुक, माऊ, करंजगाव, घोणशेत, नाणे, कांग्रे नामा
टाकवे खुर्द (नवीन): टाकवे खुर्द, थोराण, खांडशी, पाथरगाव
परंदवडी (नवीन): परंदवडी, दारूंब्रे, उर्से, गहुंजे
कुसगाव बुद्रक (नवीन): कुसगाव बुद्रुक, नांगरगाव, डोंगरगाव, वरसोली, बलवण, तुंगार्ली, वाकसाई.