देवाची यात्रा मोठ्या उत्साहात साजरी : गुलालाची मुक्त उधळण
वाल्हे – वाल्हे (ता.पुरंदर) जवळील मदनेवस्ती येथील मसनेर मंदिर व कामठवाडी येथील मसनेर मंदिरात मसनेर देवाची यात्रा मागील दोन वर्षे करोना संकटामुळे साधेपणात साजरी करावी लागली होती. यावर्षी निर्बंध हटविण्यात आल्याने मसनेर देवाची यात्रा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी मंदिरामध्ये रात्रभर छबिना व पालखी मिरवणूक काढण्यात आली होती. सकाळी देवाची विधिवत पूजाआर्चा करण्यात आली. व लगर तोडण्याचा कार्यक्रम घेण्यात आली. सायंकाळी पुन्हा ढोल, ताशा, सनईच्या तालावर गुलालाची मुक्त उधळण करीत, “मसनेर देवाचे चांगभलं’ नावाचे गजर करीत, भाविकांनी यात्रेचा आंनद लुटला. दरम्यान, जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष प्रा.डॉ.दिगंबर दुर्गाडे यांनी छबिन्यात ठेका धरल्याने, छबिन्यात वेगळीच रंगत व उत्साह वाढला होता.
यावेळी दादासाहेब मदने, पोपट मदने, भाऊसाहेब मदने, बाबू मदने, लक्ष्मण मदने, शिवा मदने, भिवा मदने, सागर मदने, संतोष मदने, धनंजय मदने, गंगाराम मदने यांसह समाजातील सर्व भाविक भक्तांनी यात्रेच आंनद घेतला. यावेळी प्रा. संतोष नवले, ओबीसी सेलचे अशोक बरकडे, माजी उपसरपंच चंद्रशेखर दुर्गाडे, राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष अध्यक्ष संदेश पवार, हनुमंत पवार, अभी दुर्गाडे, दीपक कुमठेकर, अमित झेंडे यांच्यासह अनेक मान्यवरांसह ग्रामस्थांनी मसनेर देवाचे दर्शन घेतले.