पारगाव शिंगवे-आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील शिंगवे येथील भैरवनाथ पतसंस्थेच्या वतीने ग्रामस्थांना मास्कचे वाटप करण्यात आले, अशी माहिती पतसंस्थेचे संचालक हनुमंत तागड यांनी दिली.
संस्थेचे संस्थापक आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जीवघेण्या करोना विषाणूपासून सुरक्षिततेसाठी शिंगवे ग्रामस्थांना मास्कचे मोफत वाटप करण्यात आले.
यावेळी भैरवनाथ पतसंस्थेचे संचालक सागर काजळे, योगेश बाणखेले, अशोक गव्हाणे, पोलिस पाटील गणेश पंडीत, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष तुकाराम वाव्हळ गुरुजी, गोविंदराव वाव्हळ, कोंडीभाऊ गाढवे, भाऊसाहेब गाढवे, श्रीधर गाढवे, शिवशंकर पंडीत, बाळासाहेब टाके, सुनिल पाबळे, सावता टेलर, ज्योती कुलकर्णी, छाया राजगुरु, सुनिता राजगुरु, साहेबराव टाके, नितीन वाव्हळ, शिवसेना शाखाप्रमुख बाळासाहेब टाके, शाखाधिकारी अर्जुन आढळराव, नवनाथ पाबळे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.