टेक्‍सासमध्ये आता मास्कची सक्ती नाही

टेक्‍सास  – टेक्‍सास प्रांतात मास्कबाबतच्या सक्तीचा आदेश टेक्‍सासचे गव्हर्नर ग्रेग ऍबॉट यांनी मंगळवारी रद्द केला. करोनाच्या साथीमुळे बंद असलेले उद्योग पुन्हा 100 टक्के सुरू करण्यासही परवानगी दिली असल्याचे जाहीर केले.

जवळपास अर्ध्या वर्षापासून अधिक काळासाठी बहुतेक व्यवसाय एकतर 75 टक्के किंवा 30 टक्के खुले आहेत आणि त्या काळात टेक्‍सासमधील बऱ्याच लोकांना रोजगाराच्या संधींपासून दूर रहावे लागले आहे. बऱ्याच लहान व्यवसाय मालकांना त्यांची बिले भरण्यासाठी संघर्ष करावा लागला आहे. हे आता थांबवायला पाहिजे. आता टेक्‍सास 100 टक्के खुले करण्याची वेळ आली आहे, असे लब्बॉक चेंबर ऑफ कॉमर्सला दिलेल्या भाषणात ऍबॉट म्हणाले.

आता करोनाविरोधी लस उपलब्ध झाली आहे. तसेच उपचार आणि चाचणीची सुधारीत तंत्रही सुरू झाल्यामुळे सर्व निर्बंध उठवले जात आहेत. आता करोना विषाणूपासून बचाव करण्याची यंत्रणा टेक्‍सासकडे उपलब्ध आहे, असे ते म्हणाले.

आठ महिन्यांपूर्वी अमेरिकेतील टेक्‍सास प्रांतामध्ये नागरिकांसाठी मास्क वापरणे सक्तीचे करण्यात आले होते. मात्र आता मास्क वापराबाबतची सक्ती रद्द करण्यामुळे पुन्हा संसर्ग वाढण्याची शक्‍यता काही तज्ञांनी व्यक्‍त केली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.