माॅस्को : जागतिक टेनिसमधील ड्रीमगर्ल म्हणून नावाजली जात असलेली रशियन सौंदर्यवती व मानांकित टेनिसपटू मारिया शारापोव्हा हिने आंतरराष्ट्रीय टेनिसमधून निवृत्ती जाहीर केली आहे.
मारियाने कारकिर्दीत ५ वेळा ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकल्या आहेत. फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धेचे २ वेळा, तर आॅस्ट्रेलियन, बिम्बल्डन आणि अमेरिकन ओपन ग्रँडस्लम स्पर्धेचे प्रत्येकी एकदा तिने विजेतेपद पटकावले आहे.
गतवर्षी उत्तेजक द्रव्य सेवन चाचणीत दोषी आढळल्यानंतर तिच्यावर बंदी घालण्यात आली होती. बंदीचा कालावधी पूर्ण केल्यावर तिने पुनरागमन केले. मात्र, तिला एकही स्पर्धा जिंकता आली नाही.
एकेकाळी जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या शारापोव्हाने अखेर निवृत्तीचा निर्णय घेत जागतिक टेनिसला रामराम केला.