निर्भया: १२ वर्षपूर्वीच्या मृतदेहाचे पुन्हा शवविच्छेदन

विजयवाड़ा : केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) १२ वर्षांपूर्वी बलात्कार झालेल्या निर्भयाच्या मृतदेहाला परीक्षणासाठी बाहेर काढले आहे. बी. फार्मसीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा बलात्कार करून तीचा खून करण्यात आला होता. दिल्लीतील न्यायवैद्यकीय तज्ज्ञ आंध्रप्रदेशमधील तेनाली शहरास्थित समशानभूमीत दफन केलेल्या १२ वर्षपूर्वीच्या मृतदेहाचे परीक्षण करीत आहेत.

सीबीआय अधिकाऱयांच्या देखरेखी खाली मृतदेहाला बाहेर काढण्यात आले. न्यायालयाच्या निर्देशानुसार मागील वर्षी या प्रकरणाचा तपास सीबीआयने सुरु केला होता . तपासातून गुन्हेगाराचे धागेदोरे मिळण्याची शक्यता आहे. या घटनेने संपूर्ण आंध्रप्रदेश हादरले होते.

२७ डिसेंबर २००७ ला रात्री इब्राहिमपट्टनम इथे एका खाजगी वस्तीगृहातील बाथरूममध्ये १९ वर्ष्याच्या मुलीचा मृतदेह आढळून आला होता. तत्कालीन मंत्र्याच्या नातेवाईकाचा हात असल्याचा आरोपही पीडितेच्या नातेवाईकांनी केला होता. गुन्हेगारांना वाचवण्यासाटी पोलीस आरोपीना पाठीशी घालत असल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे. बेगुन्हेगारांना शिक्षा सुनावल्याचा आरोप देखील पीडितेच्या परीजनाने केला आहे.

पोलिसांनी २००८ मध्ये फोन चोरीच्या गुन्ह्यात अटक आरोपी सत्यम बाबूने निर्भयाचा खून काबुल केल्याचा दावा केला होता. १० सप्टेंबर २१० ला विजयवाडाच्या महिला न्यायालयाने आरोपी सत्यम बाबूला आजीवन कारावासाची शिक्षा सुनावली होती.

हैद्राबाद उच्च न्यायालयाने २०१७ मध्ये आरोपी सत्यम बाबूची निर्दोष मुक्तता केली होती. आणि पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. यांनतर राज्यसरकारने या प्रकरणाची नव्याने चौकशी करण्यासाठी एसआयटीची स्थापन केली होती.

एसआयटीने केलेल्या तपासात गुन्ह्यातील कागदपत्रे गहाळ झाल्याचे आढळून आले. एसआयटीच्या तपासावर नायल्याने ताशेरे ओढले होते. नोव्हेंबर २०१८ न्यायालयाने या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे वर्ग केला.सीबीआयने गुन्यातील पुरावे नष्ट केल्याप्रकरणी न्यायालयातील काही कर्मचारविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.