रंगनाथ पठारे यांना विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार जाहीर

मुंबई – मराठी भाषा विभागाचे विंदा करंदीकर जीवनगौरव, श्री. पू. भागवत, मराठी भाषा अभ्यासक व कविवर्य मंगेश पाडगावकर भाषा संवर्धक हे चार पुरस्कार अनुक्रमे रंगनाथ पठारे, शब्दालय प्रकाशन, डॉ. सुधीर रसाळ व संजय जनार्दन भगत आणि मराठी साहित्य परिषद, आंध्रप्रदेश यांना जाहीर करण्यात आले आहे, अशी घोषणा मराठी भाषा विभाग व उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केली.

मराठी भाषेचा प्रसार, प्रचार करणाऱ्या व्यक्ती व संस्थांचा गौरव करण्यात शासनास विशेष आनंद होत असून मराठी भाषा गौरव दिनी हे पुरस्कार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याहस्ते प्रदान करण्यात येतील, असेही देसाई यांनी सांगितले. यावेळी मराठी भाषा विभागाच्या सचिव प्राजक्ता लवंगारे-वर्मा उपस्थित होत्या.

यावर्षीचा “विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार’ रंगनाथ पठारे यांना जाहीर झाला आहे. या पुरस्काराचे स्वरुप रु. 5 लक्ष रोख, मानचिन्ह व मानपत्र असे आहे. पठारे यांनी महाराष्ट्र सरकारने नेमलेल्या अभिजात मराठी भाषा समिती व अभिजात मराठी भाषा मसुदा उपसमितीचे अध्यक्ष, साहित्य अकादमी मराठी भाषा सल्लागार समिती, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृतीमंडळाचे सदस्य, वायय पुरस्कार निवड समित्यांचे अध्यक्ष व सदस्य पद भूषविलेले आहे.

यावर्षीचा पु. भागवत पुरस्कार अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथील शब्दालय प्रकाशन यांना जाहीर झाला आहे. या प्रकाशन संस्थेद्वारे महाराष्ट्रात आणि गोव्यात मिळून अनेक पुस्तक प्रदर्शने भरविली आहेत. तसेच ही संस्था दरवर्षी “शब्दालय’ हा दिवाळी अंक प्रकाशित करते.
मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार यावर्षी डॉ. सुधीर रसाळ, औरंगाबाद यांना जाहीर झाला आहे. हे पुरस्कार 27 फेब्रुवारी रोजी मराठी भाषा गौरवदिनी रवींद्र नाट्यमंदिर येथे आयोजित विशेष कार्यक्रमात प्रदान करण्यात येणार आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.