पुणे – बीड जिल्ह्यासह जालना आणि छत्रपती संभाजीनगरकडून येणाऱ्या एसटी बसला पुण्यात येण्यासाठी उशीर होत होता. मात्र, आज दिवसभर या मार्गावरील नियमित बससेवा सुरू असल्याचे पुणे एसटी विभागाकडून सांगण्यात आले. मराठा आरक्षण आणि मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ बीड, जालना यासह राज्यातील काही भागात मराठा समाजाने आंदोलन केले.
यावेळी रस्ते रोको, घोषणाबाजी आणि टरबूज फोडून आंदोलन केले. या आंदोलनामुळे महामार्गासह जिल्हा मार्गावर वाहनांची कोंडी झाली. दरम्यान, मागील आंदोलनाचा अनुभव घेता, एसटी प्रशासनाकडून सर्व परिस्थिती पाहून अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड मार्गावर बस सोडण्यात येत आहे.
शनिवारी (दि. 1७) रात्रीपर्यंत या सर्व मार्गावरील एसटीची सेवा सुरळीत सुरू होती. मात्र, आंदोलनामुळे ठिकठिकाणी होणार्या कोंडीमुळे बीड, जालनाकडून येणार्या बसला पुण्यात येण्यासाठी उशीर होत होता. त्यामुळे गाड्या उशीराने धावत असल्याचे शिवाजीनगर एसटी आगार प्रशासनाकडून सांगण्यात आले.