मुंबई – कबीर सिंग या चित्रपटामुळे चर्चेत आलेली अभिनेत्री ‘कियारा अडवाणी’ने फॅन्सच्या मनात आपले एक वेगळे घर निर्माण केले आहे. कबीर सिंग सिनेमात कियाराने एका साध्याभोळ्या मुलीची भूमिका साकारली होती. यात तिचे कपडे अतिशय साधेसुधे होते. मात्र, ती खऱ्या आयुष्यात चांगलीच ग्लॅमरस आहे. कियारा आपले हॉट अँड ग्लॅमर्स फोटो सतत इंटरनेटवर शेअर करत असते.
कियाराची ग्लॅमरस शैली चाहत्यांना देखील खूप आवडते. त्यामुळे ते तिच्या प्रत्येक फोटोवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात. कियाराने नुकतेच एका अवॉर्ड शोमध्ये हजेरी लावली. यावेळी तिने निळ्या रंगाचा जंपसूट घातलेला होता. यावेळी ती चांगलीच हॉट दिसत होती.
कियाराचा अंदाज पाहून केवळ तिचे चाहतेच नाही तर बॉलिवूड सेलेब्सदेखील घायाळ झाले आहेत. या फोटोत कियारा जबरदस्त पोझेस देताना दिसत आहे. या फोटोशूटसाठी सटल मेकअप देखील केला आहे.
बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी कियाराच्या या पोस्टवर कमेंट केल्या आहेत. अभिनेत्री आलिया भट्ट देखील कियाराच्या या जबरदस्त फोटोवर कमेंट करण्यापासून स्वतःला रोखू शकलेली नाही. सध्या तिचा हा फोटो सोशलवर चांगलाच व्हायरल होत आहे.