Manasarovar Yatra – तिबेटमधील मानसरोवराच्या यात्रेसाठी निकटच्या मार्गासाठी नेपाळकडून सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. तब्बल एक अब्ज यात्रेकरूंना या यात्रेसाठी सुविधा देण्याचे नेपाळकडून नियोजन केले जाणार आहे.
यासाठी नेपाळ आणि चीनमध्ये एक करार केला जाणार आहे. हा करार अस्तित्वात आल्यानंतर या यात्रेकरूंच्या प्रवासासाठीच्या सुविधा दिल्या जाऊ शकणार आहेत, असे नेपाळचे परराष्ट्र व्यवहार मंत्री नारायण प्रकाश सौद यांनी सांगितले.
तिबेट स्वायत्त प्रदेशातील नगारी भागामधील कैलास मानसरोवर तीर्थक्षेत्र जगभरातील हिंदूंसाठी सर्वात पवित्र मानले जाते. बौद्ध, जैन आणि तिबेटच्या स्वदेशी बोनपा अशी दोन नैसर्गिक पवित्र स्थान या यात्रेमध्ये आहेत.
जगभरातील असंख्य भारतीय हिंदू नेपाळमार्गे आदरणीय कैलास मानसरोवर यात्रेला जाण्यास प्राधान्य देतात. म्हणूनच सौद यांच्या महत्त्वाकांक्षी योजनेला महत्त्व आहे. या यात्रेमधून नेपाळला मोठ्या प्रमाणावर परदेशी गंगाजळीही मिळते आहे.
कोविड-19 दरम्यान लागू केलेला लॉकडाउन उठवल्यानंतर चीनने या वर्षी कैलास मानसरोवरची यात्रा सुरू केली आहे. तथापि, यायात्रेसाठीच्या शुल्कामध्ये प्रचंड वाढ आणि व्हिसावरील अनेक निर्बंध,
विशेषत: भारतीय यात्रेकरूंसाठीच्या व्हिसावरील नियंत्रणामुळे ही यात्रा व्यावहारिकरित्या झाली नाही. नेपाळ आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी कैलास मानसरोवरला जाण्यासाठी सर्वात जवळचा मार्ग देऊ शकतो.
भारतासह जगभरातील लाखो हिंदू यात्रेकरूंना कैलास मानसरोवरला भेट देण्यासाठी योग्य मार्गाचा अभ्यास सौद यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने केला आहे.
नेपाळमधून कैलास मानसरोवर भागात जाण्याचे तीन मार्ग म्हणजे हुमला जिल्ह्यातील हिलसा, बझांगची खोरी आणि दार्चुला जिल्ह्यातील टिंकर हे सर्व पश्चिम नेपाळमधील आहेत.
मानसरोवर सरोवर हे हुमला जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या सिमीकोटच्या वायव्येस सुमारे 160 किलोमीटर अंतरावर आहे. या मार्गांवरून यात्रा सुरू करण्यासाठी नेपाळला चीनबरोबर एक करार करावा लागणार आहे