Manoj Jarange : राज्यातील मराठा आरक्षणावरून मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांनी सरकारला दिलेली डेडलाईन उद्या 24 डिसेंबर रोजी संपणार आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा राज्यात मराठा आंदोलन पेटणार असल्याचे दिसत आहे. त्यापूर्वी आज 23 डिसेंबर रोजी बीडमध्ये जरांगे पाटलांची (Manoj Jarange Patil) सभा आयोजित करण्यात आली आहे.
बीड येथील सोलापूर- धुळे महामार्गावरील पाटील मैदानात जाहीर सभा होत आहे. अल्टीमेटम संपण्यापूर्वीची ही शेवटची सभा असल्याने निर्णायक इशारा सभा असे नाव देण्यात आले आहे. या सभेला बीडसह शेजारच्या जिल्ह्यातून लाखो मराठा बांधव उपस्थित राहिले असून, मोठी गर्दी यावेळी पाहायला मिळत आहे. आपल्या भाषणात बोलताना मनोज जरांगे यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
– या सभेतही मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांच्यावर टीकास्त्र सोडलं. सभेतील गर्दी पाहून छगन भुजबळ अस्वस्थ झाले असतील, अशी टीका केली.
– आपल्या निष्पाप पोरांवर खोटे गुन्हे दाखल केलं असून, शांतात प्रिय मराठ्यांवर खोटे आरोप केले जात आहे.
– आम्हाला आरक्षण मिळू दे तुम्हाला कचका दाखवतो अशी बोचरी टीका मनोज जरांगे यांनी छगन भुजबळ यांच्यावर केली.
– या सभेतही मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांच्यावर टीकास्त्र सोडलं. सभेतील गर्दी पाहून छगन भुजबळ अस्वस्थ झाले असतील, अशी टीका केली.
– मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा सरकारला इशारा दिला आहे. छगन भुजबळ यांचं ऐकून आरक्षण नाकारू नका, अन्यथा सरकारला जड जाईल असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.