पुणे – एका माजी उपसभापती आणी बांधकाम व्यवसायीकाला पत्नीला 50 लाख रुपयांची खंडणी छोटा राजनची पुतणी प्रियदर्शनी निकाळजे हिने मागितली होती. याप्रकरणी छोटा राजनचा हस्तक मंगेश वाईकर याला गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे.
फिर्यादी राजेश जवळेकर यांनी दिलेल्या फिर्यादीनूसार हा गुन्हा दाखल झाला होता .मंदार वाईकर हा बिबवेवाडी राहात असून तो सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत.फिर्यादीची दुसरी पत्नी व मेव्हणी यांनी जवळेकर यांच्याकडे मर्सिडिज गाडीची मागणी केली होती. ही मागणी जवळेकर हे पूर्ण करु शकले नाही. तसेच मागील सहा महिन्यांपासून जवळेकर यांच्या पत्नीचे त्यांच्याशी पटत नव्हते , यामुळे तीला घटस्फोट हवा होता. त्यांच्या पत्नीने तीन ते चार चित्रपटात काम केले आहे. तर मेव्हणीसुध्दा सध्या चित्रपटात काम करते. या दोघींनी छोटा राजनची पुतणी प्रियदर्शनी निकाळजे (रा. जांभुळकरनगर, वानवडी) हिच्याकडे तक्रार केली होती. त्यावरुन प्रियदर्शनी हिने धीरज साबळे याला सांगून जवळेकर यांना बोलावून घेतले होते. तेथे तिने जवळेकर यांना पिस्तुलाचा धाक दाखवून 50 लाख रुपयांची खंडणी मागितली. त्याला पत्नीला घटस्फोट देण्यास सांगून मंदार आमचा छोटा राजन कंपनीचा राईट हॅंड आहे. तो तुला पिस्तुलातील 10 च्या 10 गोळ्या घालून मारुन टाकेल, अशी धमकी दिली होती.
त्यानंतर जवळेकर यांनी घाबरुन गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाकडे धाव घेतली होती. त्यांच्याकडून 25 लाखाचा पहिला हप्ता घेण्यासाठी आलेल्या धीरज साबळे याला सापळा लावून अटक करण्यात आली होती. त्यानंतर प्रियदर्शनी निकाळजे व मंदार वाईकर हे फरार झाले होते. त्यातील वाईकर याचा शोध घेऊन पोलिसांनी त्याला अटक केली आहे. आता प्रियदर्शनी निकाळजे हिचा शोध सुरु आहे. तर फिर्यादीची पत्नी आणी मेव्हणीचीही चौकशी करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.