अभिनेत्री मंदाना करिमीने “द कॅसिनो’ या नवीन वेबसिरिजसाठी पोल डान्सचा सराव करताना जखमी झालेल्या घटनेची आठवण केली आहे. मंदाना म्हणाली, “पोल डान्सच्या उद्देशाने मी दोन दिवस सराव केला. अर्थात प्रोफेशनल्सने ज्या पद्धतीने केला, तसे मी करू शकले नाही.
परंतु मी सर्वोत्तम करण्याचा प्रयत्न केले. परंतु सरावादरम्यान माझे संपूर्ण शरीर जखमी झाले आणि शूटिंगच्या वेळी मेकअपचा वापर करून ते लपवावे लागले. कारण मला त्या दिवशी काहीही करून परफॉर्म करायचा होता.
“द कॅसिनो’ ही एका श्रीमंत परंतु विनम्र मुलीची कथा आहे. जी आपल्या वडिलांच्या अब्जावधी डॉलर्सच्या कॅसिनोची वारस आहे. यात बऱ्याच रहस्यमय गोष्टी असून या हायक्लास सोसायटीमधील कटकारस्थानचा खुलासा होतो.
दरम्यान, या शोमध्ये करणवीर बोहरा, सुधांशु पांडे, मंदाना करिमी, आंद्रिता रे, धनवीर सिंह आदी कलाकारांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत. या शोचे दिग्दर्शन हार्दिक गज्जर यांनी केले असून 12 जूनपासून त्याचे जी-5वर प्रसारण होणार आहे.