मंदाकिनी खडसेंचा अटकपूर्व जामीनाचा अर्ज फेटाळला

मुंबई – पुण्यातील भोसरी जमीन गैरव्यवहार प्रकरणात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांनी सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज सादर केला होता. मात्र, न्यायालयाने हा अर्ज फेटाळून लावला आहे.

मंदाकिनी खडसे यांच्याविरोधात मुंबई सत्र न्यायालयाने अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केले आहे. याच प्रकरणात एकनाथ खडसेही आज सत्र न्यायालयात जाऊ शकले नाहीत. खडसे यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्यामुळे ते सध्या बॉम्बे रुग्णालयात दाखल आहेत.

एकनाथ खडसे यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती त्यांच्या वकिलाने आज कोर्टात दिली. त्यामुळे कोर्टासमोर हजर राहण्यास खडसेंच्या वकिलांनी वेळ मागितला आहे. न्यायालयाकडूनही खडसे यांना उपस्थित राहण्यासाठी वेळ देण्यात आला आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता 21 ऑक्‍टोबर रोजी होणार आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.