बॅंकाॅक – थायलंड येथील तरूणाने एका विषारी सापासोबत लग्न केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. प्रेयसीचा मृत्यू झाल्यानंतर ती या सापाच्या रूपाने परत आली आहे, असे तरूणाचे म्हणणे आहे.
‘मी माझ्या पत्नीवर खूप प्रेम करतो. माझ्या प्रेयसीने दुसरा जन्म घेतला आहे. लोकं काहीही म्हणले तरी मी माझ्या पत्नीला सोडणार नाही’, असे तरूणाने म्हटले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तरूणाच्या प्रेयसीचा पाच वर्षापूर्वी मृत्यू झाला होता. त्यानंतर त्याने 10 फूट लांब कोबरा सापासोबत लग्न केले. तो सापाला पत्नीसारखे वागवत आहे. लग्न केले तेंव्हापासून तरूण त्या सापासोबतच झोपतो, जेवण करतो.
प्रेयसीचा मृत्यू झाल्यानंतर ती या सापाच्या रूपात जन्म घेऊन त्याच्यासोबत राहण्यासाठी आली आहे, असे तरूणाचे म्हणणे आहे.
रिपोर्टमध्ये सांगितल्यानुसार, सापासोबत लग्न केल्यानंतर दोघेही सोबत टीव्ही पाहतात. तसेच फिरायला देखील जातात. कोबरा हा खूप विषारी साप आहे. मात्र त्या सापाने आतापर्यंत त्याला काहीही नुकसान पोहोचवले नाही.
तरूणाच्या प्रेयसीचा पाच वर्षापूर्वी मृत्यू झाला होता. काही दिवसानंतर त्याला कोबरा साप भेटला. आता त्याला वाटते की, त्याच्या आयुष्यात त्याचे प्रेम पुन्हा परत आले आहे. त्याच्या एका मित्राने या अनोख्या जोडप्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.