मुंबई – बॉलिवूडमधील अभिनेता अर्जुन कपूर आणि अभिनेत्री मलायका अरोरा या कपलची कोणत्या न कोणत्या कारणामुळे नेहमीच चर्चा रंगलेली असते. अनेकदा ते दोघे एकत्र फिरताना दिसतात. दोघेही सोशल मीडियावर सक्रिय असून अनेक फोटो ते चाहत्यांसोबत शेअर करत असतात. कधी या स्टार्सना ट्रोल केलं जातं तर कधी लाईकही केलं जातं.
अर्जुन आणि मलायका अनेकदा एकमेकांवर किती प्रेम करतात हे व्यक्त करतात. मात्र, गेल्या दोन दिवसांपासुन या दोघांच्या ब्रेकअपची बातमी तुफान व्हायरल होताना दिसत आहे. अभिनेता अर्जुन कपूर आणि अभिनेत्री मलायका अरोरा हे कपल वेगळं झाल्याचं यातून सांगण्यात येत आहे.
दारम्यान, अर्जुन पासून वेगळं झाल्यानंतर मलायाकाने त्याच्या नात्यातील सर्व लोकांना सोशल मीडियावर अनफॉलो केले आहे. अभिनेत्रीने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून अर्जुन कपूरच्या बहिणी अंशुला कपूर, जान्हवी कपूर आणि खुशी कपूर यांना अनफॉलो केले.
एवढेच नाही तर मलायका आता अर्जुन कपूरचे वडील बोनी कपूर आणि भाऊ अनिल कपूर यांना फॉलो करत नाहीये. मात्र, या सर्वांशिवाय मलायकाने अद्याप अर्जुन कपूरला अनफॉलो केलेले नाही. त्यामुळे आता पुन्हा एकदा हे कपल चर्चेत आलं आहे.
अभिनेत्रीने खास संदेश असलेला स्वेटशर्ट केला परिधान
मात्र, अश्यातच मलायका अरोराचा एक व्हिडिओ समोर आला. ज्यामध्ये ती मीडिया समोर खास संदेश असलेला स्वेटशर्ट परिधान करताना दिसली होती. खरंतर या स्वेटशर्टवर लिहिलेलं होतं, ”Lets fall apart’ यासोबतच त्यावर स्मायलीही बनवण्यात आली होती.
हा मेसेज वाचून तिचे चाहते खूप नाराज झाले आहेत. कुठेतरी मलायका या मेसेजद्वारे अर्जुन आणि त्याच्या ब्रेकअपच्या बातम्यांना दुजोरा देत असल्याचं यातून दिसून येत आहे.