मुंबई – बॉलिवूडमधील एका प्रसिद्ध अभिनेत्रीने दिवंगत बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा फ्लॅट खरेदी केला आहे. या घराबाबत अनेक प्रकारच्या बातम्या येत होत्या की, काही लोक घर घेण्याचा प्रयत्न करत आहेत. सुशांत सिंग राजपूतने 2020 मध्ये वांद्रे येथील या फ्लॅटमध्ये अखेरचा श्वास घेतला आणि तेव्हापासून हे घर प्रसिद्धीच्या झोतात आले होते. आता बॉलीवूड अभिनेत्रीनेच हे घर खरेदी केल्याचे समजते.
समोर आलेल्या माहितीनुसार या इमारतीचे नाव माउंट ब्लँक आहे, ज्यामध्ये सुशांत सिंह राजपूत राहत होता. ते घर ‘द केरळ स्टोरी’ ची मुख्य अभिनेत्री अदा शर्माने विकत घेतले आहे. ती या घरात कधी शिफ्ट होणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. अभिनेत्याचा हा फ्लॅट त्याच्या मृत्यूनंतरही चांगलाच चर्चेत होता. सुशांत सिंह राजपूतने याच घरात आत्महत्या केली होती. सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर या अपार्टमेंटला जास्त मागणी होती, त्यामुळे घराचे भाडे वाढले होते. आता अखेर अदा शर्माने हा फ्लॅट विकत घेतला असल्याचे समजते.
सुशांत सिंग राजपूतचे 14 जून 2020 रोजी निधन झाले. 2021 मध्ये, मुंबईतील समुद्रकिनारी असलेले हे घर भाड्याने असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. या दुमजली घरासाठी अभिनेता दरमहा साडेचार लाख रुपये भाडे देत असे.
अदा शर्मा ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटापासून प्रसिद्धीच्या झोतात आली. वादात असूनही या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. ‘द केरळ स्टोरी’मधील अभिनेत्रीच्या भूमिकेने लोकांची मने जिंकली.याशिवाय अदाची वेब सीरिज ‘कमांडो’ 11 ऑगस्ट रोजी डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रसारित झाली. अदा शर्मा लवकरच श्रेयस तळपदेसोबत ‘द गेम ऑफ गिरगिट’ या चित्रपटात दिसणार आहे.