मुंबई – सिनेसृष्टीत आपल्या अदांनी अनेकांना घायाळ करणारी मलायका अरोराने नुकत्याच झालेल्या एका फॅशन वीकमध्ये हजेरी लावली. अभिनयापेक्षा डान्स आणि फिटनेससाठी मलायका नेहमीच ओळखली जाते. या फॅशनवीकमध्ये मालयकाने रॅम्पवर आपली अदाकारी दाखवत दमदार ठुमके लगावले. मालयकाची ही स्टाईल पाहून प्रेक्षक देखील धक्क झाले.
यावेळी मलायका अरोरा ही फॅशन डिझायनर गोपी वैद्यची शोस्टॉपर होती.रॅम्पवर मलायका अरोराचा हा डान्सिंग व्हिडिओ सोशल मीडियावर येताच व्हायरल झाला. या वयातही मलायकाची सुंदर स्टाईल लोकांना आवडली आहे. मलायका एका शानदार वर्क लेहेंग्यात दिसत आहे. त्याचबरोबर तिने केसांचा बन बनवून गजरा घातला आहे, जो तिचा लूक आणखी अप्रतिम करत आहे. व्हिडिओमध्ये रॅम्पवर मलायकाची मस्ती सांगत आहे की ती रॅम्प वॉक आणि आउटफिटचा किती आनंद घेत आहे.
View this post on Instagram
बऱ्याच कालावधीनंतर मलायका रॅम्पवर दिसली यामुळे तिचे चाहते निश्चितच खुश झालेले पाहायला मिळाले. मलायका तिच्या फिटनेसबाबत खूप जागरूक आहे. खाण्यापिण्याची काळजी घेण्यासोबतच ती नियमितपणे जिममध्ये जाते. तिचे अनेक जिम लूक देखील चांगलेच व्हायरल होत असतात.