वाल्हे: देशामध्ये कोरोना विषाणूने धुमाकूळ घातलेला असताना, सर्व स्तरावरील प्रशासन कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी झुंज देत असताना, पुरंदर तालुक्यातील जेऊर येथे वाळू माफियांनी धुमाकूळ घातल्याने प्रशासनाने वाळू माफियांना आवरायचे की, कोरोनाच्या संकटाला ? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
बुधवार (दि.०६) सायंकाळी जेऊर नजिक रसाळ महाराजमठा शेजारी निरा नदीपात्रामध्ये अवैध्य वाळू उपसा सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पथकाने या ठिकाणी छापा घातला असता लाखो रूपयांचा वाळूसाठा व वाळू उपसा करणारी यंत्रे जप्त करण्यात आली. याबाबत जेजुरीचे सहाय्यक पोलिस माने यांनी दिलेल्या माहितीनुसार जेऊर नदीपात्रामधुन मोठ्या प्रमाणावर अवैध्यरित्या वाळू उपसा सुरू होता.काल सायंकाळी याठिकाणी छापा घातला असता दोन पोकलेन मशिन, दोन ट्रॅक्टर, एक डंपर, वाळू धुण्याचे इंजिन व मोठ्या प्रमाणात उपसा केलेले वाळूचे ढिग त्या ठिकाणी सोडुन मशिनचे चालक अंधाराचा फायदा घेऊन पळुन गेले.
सदर ठिकाणी उत्खनन केलेले खड्डे दिसून आले. ते गावकामगार तलाठी एस. एन खरात यांनी केलेल्या पंचनाम्या प्रमाणे ३०×१५×१०= ४५ ब्रास , १०×१०×१०= १० ब्रास, २०×१०×१५=२० ब्रास, ५०×२०×१५=१५० ब्रास असे, एकूण २२५ ब्रास वाळूचे उत्खनन केल्याचे दिसून येत आहे. उत्खनन केलेल्या ठिकाणी वरील वर्णनाची वाहणे आढळून आली आहेत.
बुधवार (दि.०६) रोजी रात्री ०९ दरम्यान, जेऊर (ता.पुरंदर) येथील निरा नदीचे पाञात गट नं. ९१० जवळ, राजेंद्र बजरंग पटणे (रा. पिंपरे खुर्द ता.पुरंदर), संजय मारूती धुमाळ, दत्तात्रय श्रीरंग धुमाळ, हनुमंत पोपट होळकर (रा. रूई ता. खंडाळा,जि.सातारा), व इतर ६ ते ७ साथीदार हे आपल्या ताब्यातील वरील वर्णनाच्या साधनांनी वाहनामध्ये शासनाची रॉयल्टी न भरता शासनाचा महसूल बुडवून, गौण खनिज वाळूची चोरी तसेच उपसा व साठा त्यामध्ये , वाळू, साधने व वाहने असे एकूण सत्तेचाळीस लाख, तेवीस हजार तीनशे सह अ.नं. १ मिळून आला व इतर पळून गेले. त्याबाबत आज (दि.०८) रोजी मा. तहसीलदार पुरंदर यांच्या कडील जावक क्रमांक गौ.ख/कावि /२२३/२०२० अन्वये पञासोबत गावकामगार तलाठी जेऊर यांचा रिपोर्ट व पंचनामा प्राप्त झाल्याने वरील आरोपी विरूद्ध भा. द. वि कलम ३७९,३४ प्रमाणे कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अंकुश माने यांनी सांगितले.
वाळू उपसा करणारी वाहने जप्त करण्यात आली असुन पुरंदरच्या तहसिदार रूपाली सरनोबत यांच्याशी केलेल्या चर्चेनंतर जप्त केलेल्या वाळूसाठ्य़ाचा त्याच ठिकाणी लिलाव करुन वाळू उपसा करणाऱ्या यंत्रांच्या मालकासह चालकावर गुन्हा दाखल करणार असल्याचे माने यांनी सांगितले. पोलिसांच्या छाप्यातील पथकामध्ये ,गणेश कुतवळ, धर्मराज खाडे, विजय ओंबासे, शैलेश स्वामी, देवेंद्र खाडे आदी सहभागी झाले होते.