एकवीरा देवी मंदिरात महानवमी होमहवन

कार्ला – नऊ दिवसांपासून सुरू असलेली आई एकवीरादेवी नवरात्रोत्सव यात्रा सोमवारी (दि. 7) म्हणजेच अश्‍विन शुद्ध महानवमीला पहाटे तीन वाजता एकवीरा देवस्थान प्रशासकीय समितीच्या वतीने मावळ गटविकास अधिकारी शरदचंद्र माळी, मंडल अधिकारी (कार्ला) माणिक साबळे, पोलीस पाटील अनिल पडवळ, गुरव प्रतिनिधी संतोष देशमुख यांच्या हस्ते आई एकवीरा देवीचा अभिषेक करून व त्यानंतर देवीची पहाटे आरती करण्यात आली. त्यानंतर उत्सावाची सांगता महानवमी होम करुन करण्यात आली.

या वेळी एकवीरा देवी मुख्य पुजारी व विश्‍वस्त संजय गोविलकर, नवनाथ देशमुख, ऍण्ड जयवंत देशमुख, प्रकाश पोरवाल, मंगेश गायकवाड यांची प्रमुख उपस्थित होती. महानवमी होमसाठी मुंबईसह पुणे व राज्यातून अनेक भाविक उपस्थितीत होते. त्यामुळे गड परिसर आई एकवीरा देवीचा, आई माऊलीचा उदो उदो जयघोष करत एकवीरा देवी मंदिर परिसर दुमदुमून गेला होता.

प्रशासनाच्या वतीने नऊ दिवस विविध कार्यक्रम घेण्यात आले. यामध्ये होम हवनपूजा पठन असे विविध धार्मिक कार्यक्रमचा भाविकांनी लाभ घेतला महानवमी होमाच्या दिवशी मंदिरात कुठल्याही प्रकारची भाविकांना गैरसोय होऊ नये, कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये व यात्रा शांततेने पार पडावी यासाठी लोणावळा ग्रामीण पोलीस निरीक्षक संदीप घोरपडे, सहायक पोलीस निरीक्षक निरंजन रनवरे, योगेश जगताप, विशाल जांभळे, अमित ठोसर, गणेश होळकर, पोलीस वाडेकर यांच्यासह 150 ते 200 होमगार्ड लोणावळा पोलीस ठाणे सर्व कर्मचारी व प्रशासकीय विभागाचे सर्व कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

Leave A Reply

Your email address will not be published.