नवी दिल्ली – महिंद्रा व हिरो मोटो कॉर्प या कंपन्यानी आपल्या वाहनात दरात वाढ करीत असल्याची घोषणा केली आहे. ही दरवाढ जानेवारी महिन्यापासून लागू होणार असल्याचे या कंपन्यानी या आठवड्यत जाहीर केले आहे.
त्यामुळे काल महिंद्रा कंपनीच्या आणि आज हिरो मोटो कॉर्प कंपनीच्या शेअरच्या भावात वाढ झाली. कच्च्या मालाचे दर वाढत असल्यामुळे आम्हाला दरवाढ करावी लागत असल्याचे या कंपन्यानी म्हटले आहे. 1 जोनेवारीपासून हिरो मोटो कॉर्प आपल्या वाहनाच्या दरात दिड हजार रुपयापर्यंत वाढ करणार आहे. गेल्या आठवड्याता मारुती आणि फोर्ड कंपन्यानी दरवाढ जाहीर केली आहे.
या कंपन्यानी युरो – 6 तंत्रज्ञानासाठी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक गेल्या वर्षी केली आहे. दरम्यानच्या काळात काही महिने वाहनांची विक्री कमी झाली आहे. त्यामुळे कंपन्याना खेळत्या भांडवलाचा प्रश्न सताऊ लागला आहे. त्यामुळे वाहन कंपन्या काही प्रमाणात दरवाढ करत असल्याचे विश्लेषकानी सांगितले.
काही कंपन्यानी जीएसटी दरात कपात करण्याची गरज असल्याचे सांगितले होते. मात्र सरकारलाही महसूलाची गरज असल्यामुळे सरकार जीएसटीत कपात करू शकणार नसल्याचे सरकारने सांगितले आहे. त्यामुळे कंपन्या दरवाढ करीत असल्याचे सांगितले जाते.