नवी दिल्ली – व्हाट्सअॅप पे सुविधा भारतात उपलब्ध झाली आहे. यासाठी व्हाट्सअॅप या सोशल मीडिया कंपनीने चार बॅंकांची सहकार्य करार केला आहे. त्यामध्ये स्टेट बॅंक ऑफ इंडिया, आयसीआयसीआय बॅंक, एचडीएफसी बॅंक आणि ऍक्सिस बॅंकेचा समावेश आहे.
फेसबूक या कंपनीच्या मालकीचे व्हाट्सऍप आहे. गेल्या दोन वर्षापासून व्हाट्सऍप पे सुरू करण्याची तयारी चालू होती. मात्र विविध परवानग्यामुळे त्याला उशीर झाला आहे.
भारतात व्हाट्सऍपचे 40 कोटी ग्राहक असून युनिफाईड पेमेंट इंटरफेस म्हणजे यूपीआय आधारावर व्हाट्सअप पे सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. व्हॉट्सऍप इंडियाचे प्रमुख अभिजीत बोस यांनी सांगितले की, या सुविधा सुविधेमुळे भारत सरकारच्या डिजिटल इंडिया मोहिमेस चालना मिळेल. भारतात रोखीचा वापर कमी होण्यास मदत होईल.
सध्या विविध पेमेंट यंत्रणांना दोन कोटी ग्राहकांची मर्यादा घालून देण्यात आलेली आहे. आगामी काळात ही मर्यादा काही प्रमाणात शिथील होण्याची अपेक्षा या कंपन्यांना आहे. सुरुवातीला व्हॉट्सऍप पेमेंट सुविधा काही काळ चालविल्यानंतर आणखी वित्तीय सेवा देण्याचा कंपनीचा प्रयत्न राहील.