मुंबई – आगामी काळात होणाऱ्या लोकसभा निवडणुकांकडे (Loksabha Election 2024) संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. लोकसभा निवडणुकीनंतर अनेक राज्यातील भाजप सरकारांचे देखील भविष्य ठरणार आहे. महाराष्ट्रात आगमी लोकसभा निवडणूक महाविकास आघाडी (MVA) विरोधात शिंदे भाजप सरकार अशीच होणार असल्याचे जवळजवळ स्पष्ट झालं आहे. त्या अनुषंगाने लोकसभेसाठी महाविकास आघाडीचं जागा वाटप अंतिम टप्प्यात आलं असल्याचं बोललं जात आहे.
मुंबईत लोकसभेच्या एकूण सहा जागा आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीने मुंबईतील जागा वाटपात चार दोन असा फॉर्म्युला वापरला आहे. या फॉर्म्युल्यानुसार ठाकरे गटाच्या वाट्याला चार जागा आल्या असून काँग्रेसच्या वाट्याला दोन जागा आल्या आहेत. या जागा वाटपात शरद पवार गटाला मुंबईतील एकही जागा देण्यात आलेली नाही.
लोकसभेसाठी मविआची 44 जागांवर बोलणी पूर्ण झाली असलयाचे समजते. यामध्ये ठाकरे गट (Thackeray Group) 19 ते 21, काँग्रेस (Congress) 13 ते 15, शरद पवार गट (Sharad Pawar Group) 10 ते 11 जागा लढेल. तर चार जागांवर चर्चेतून निर्णय निघणार असल्याचे समजते.
असं आहे मुंबईच वाटप
ठाकरे गट – दक्षिण मध्य,ईशान्य मुंबई,उत्तर पश्चिम मुंबई,दक्षिण मुंबई
काँग्रेस – उत्तर मध्य मुंबई,उत्तर मुंबई
वंचित आघाडी आणि राजू शेट्टी यांच्यासाठी देखील जागा
महाविकास आघाडीत (MVA) दोन जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. अकोला आणि हातकणंगलेची जागा राखीव ठेवल्या आहेत. वंचित आल्यास अकोल्याची जागा दिली जाईल. वंचित न आल्यास जागा काँग्रेसकडे जाईल. हाणकणंगलेची जागा राजू शेट्टींसाठी (Raju Shetty) राखीव ठेवण्यात आली आहे. राजू शेट्टी महाविकास आघाडीत न आल्यास ही जागा पवार गट लढवणार असल्याचं देखील बोललं जात आहे.