पुणे : गेल्या काही दिवसांपासून सातत्याने आपल्या महाराष्ट्राच्या भूमीचा , येथील महापुरुषांचा अवमान होईल या पद्धतीची कृती या राज्यात सातत्याने घडत आहे. या सर्व अवमानानांचा निषेध करण्यासाठी व अश्या प्रकारच्या प्रवृत्तींना खऱ्या इतिहासाची ओळख करून देण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने महाराष्ट्र सन्मान परिषद यात्रा काढण्यात येणार आहे. त्याचा शुभारंभ येत्या शुक्रवारी ( दि. 3 फेब्रुवारी) टिळक स्मारक मंदिर येथे होणार असल्याची माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिली.
पक्षाचे प्रवक्ते प्रवक्ते अंकुश काकडे , प्रदीप देशमुख , महेश शिंदे यावेळी उपस्थित होते. या परिषदेच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव असणार असून माजी गृहनिर्माणमंत्री. डॉ.जितेंद्र आव्हाड,शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे , सुप्रसिद्ध शाहिरसंभाजी भगत ,सुप्रसिद्ध शिवव्याख्यात्या .वैशाली डोळस हे प्रमुख वक्ते असणार आहेत.
Maharashtra Politics : ‘हास्यजत्रा’ फेम सिनेअभिनेते प्रभाकर मोरेंचा राष्ट्रवादीत प्रवेश
या यात्रेसाठी लोकायत , अखिल भारतीय मराठा महासंघ फुले-शाहू-आंबेडकर विचार मंच भारतीय बौद्ध महासंघ ,म. फुले समता परीषद ,गणराज्य संघ, जमाईत उलेमा ए हिंद , मातंग एकता आंदोलन ,मुलनिवासी मुस्लिम मंच , लहुजी समता परिषद , रिजनल ख्रिश्चन सोसायटी , माळी महासंघ ,हमाल पंचायत पुणे मर्चेंट संघटना, अखिल छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड युनियन, छत्रपती शिवाजी टेम्पो संघटना महाराष्ट्र राज्य खासगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघ समर्थ सेवा रिक्षा प्रतिष्ठान अंगमेहनतीची कष्टकरी संघर्ष समिती,युवा मातंग सेवा संघ, राष्ट्रीय बहुजन महासंघ,पुणे महासंघ,कागद-काच – पत्रा पंचायत आदी सहयोगी संस्था या यात्रेत सहभागी होणार आहेत.