आदिपुरुष हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून चांगलाच चर्चेत आहे. ओम राऊत दिग्दर्शित या चित्रपटात आजच्या काळानुसार रामायण मोठ्या पडद्यावर सर्वांसमोर प्रदर्शित झाला. मात्र रिलीजच्या पहिल्याचं दिवशी या चित्रपटावर नेटकऱ्यानी समीक्षकांनी नाराजी व्यक्त केली. अशात एका नेटकऱ्याला ट्रोल करणे चांगलेच महागात पडले आहे. नेटकऱ्याने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा काही संबंध नसतांना एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. ज्यामुळे ठाणे पोलीस काय कारवाई केली आहे. नेटकऱ्याने पोस्ट केलेला फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
Didn’t know Eknath Shinde was in Adipurush 🤔@mieknathshinde#Adipurush #AdipurushTickets #AdipurushOnJune16 #AdipurushReview #SaifAliKhan pic.twitter.com/saGqpFIhEz
— Abhay 👔 (@xavvierrrrrr) June 16, 2023
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आदिपुरुषाच्या माकड पात्रासोबतचा फोटो दाखवणारे ट्विट व्हायरल होत आहे, ज्यामध्ये असे लिहिले आहे की,’एकनाथ शिंदे आदिपुरुषात आहेत हे माहित नव्हते.’
अभिनेता प्रभास आणि अभिनेत्री क्रिती सेनन अभिनीत आणि ओम राऊत दिग्दर्शित आदिपुरुष चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटातील पात्रांबाबत शेकडो मिम्स शेअर केले जात आहेत. पण या सोशल मीडिया अभय नावाच्या तरुणाने पोस्टही शेअर केली,’ज्यामध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्याची तुलना हनुमानासारख्या पात्राशी करण्यात आली होती.’ यावर आता ठाणे पोलिसांनी कारवाई केली आहे. या ट्विटची माहिती ठाणे पोलिसांना मिळताच त्यांनी कारवाई केली. पोलिसांनी हे ट्विट करणाऱ्या अभय नावाच्या तरुणाचा फोन नंबर मागितला आहे. तरुणानेही उत्तरात विचारले आहे, ‘का काय झाले? काय आहे प्रकरण?यानंतर संबंधित तरुणावर गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. सध्या हे ट्विट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.