पाचगणी – महाराष्ट्राच नंदनवन महाबळेश्वरचा वेण्णा लेक तलाव संततधार पावसामुळे तुडुंब पाण्याने भरुन ओसांडून वाहत आहे. गेल्या दोन दिवसापासून महाबळेश्वरला पावसाचा जोर वाढला आहे.
महाबळेश्वरचे जनजीवन वाढत्या पावसामुळे विस्कळीत झाले आहे. आजअखेर महाबळेश्वरमध्ये ५३ इंच पावसाची नोंद झाली आहे. पर्यटकांना पावसाळ्यात वेण्णालेकचे नौका विहार सुरक्षिततेच्या कारणास्तव बंद करण्यात येत असते.
घरगुती गॅस सिलिंडर दरवाढीवरून भाजप खासदाराचा घरचा आहेर…
वेण्णा लेक पाण्याने भरला असताना धुक्याची दुलई सदैव नयनरम्य वातावरण तयार करत पर्यटकांना मनमोहीत करत असते.
वेण्णा लेक भरला असल्याने पाचगणी व महाबळेश्वर शहरांचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे .
त्वचरोगापासून हृदयरोगापर्यंत अत्यंत फायदेशीर असते डार्क चॉकलेट ! जाणून घ्या अन्य फायदे