कार्ती चिदंबरम यांच्या अडचणीत वाढ, आणखी एका मालमत्तेची झडती

नवी दिल्ली – कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते पी.चिदंबरम यांचे खासदारपुत्र कार्ती यांच्या चेन्नईतील निवासस्थानावर शनिवारी सीबीआयने छापा टाकला. चिनी व्हिसाशी संबंधित लाचखोरी प्रकरणी सीबीआयने झडती घेतल्याचे समजते.
पंजाबमध्ये वीज प्रकल्पाच्या उभारणीसाठी 263 चिनी कर्मचाऱ्यांना व्हिसा हवा होता. त्यासाठी एका कंपनीकडून कार्ती आणि त्यांच्या सहकाऱ्याने 50 लाख रुपयांची लाच घेतल्याचा आरोप आहे. त्या घडामोडीवेळी चिदंबरम केंद्रीय गृहमंत्री होते. संबंधित प्रकरणी सीबीआयने चालू वर्षी मेमध्ये कार्ती यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला.
त्यानंतर त्यांच्या चेन्नईतील निवासस्थानाची झडती घेण्यात आली. त्यावेळी त्या निवासस्थानातील काही दालने कुलूपबंद होती. त्या कुलुपांच्या चाव्या त्यावेळी परदेशी असणाऱ्या कार्ती यांच्या पत्नीकडे होत्या. त्यामुळे ती दालने सील करण्यात आली. सीबीआयला चाव्या उपलब्ध झाल्यानंतर सील करण्यात आलेल्या दालनांची तपासणी करण्यात आली.
महागाईवरून राहुल गांधींचा पुन्हा हल्लाबोल…
कार्ती यांनी याआधीच त्यांच्या विरोधातील संबंधित प्रकरण बोगस स्वरूपाचे असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. राजकीय सुडापोटी ते प्रकरण दाखल करण्यात आल्याचाही त्यांचा आरोप आहे.
शिवसेना खासदारांच्या ‘सेटिंग’साठी मुख्यमंत्री शिंदे दिल्लीत? दानवेंच्या वक्तव्याने चर्चांना उधाण…





