चेन्नई : भारताचा बुध्दिबळपटू के पी मंगेश चंद्रन याने इंग्लंडमधील ९५ व्या हॅस्टिंग्ज आंतरराष्ट्रीय बुध्दिबळ काँग्रेस स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे. ग्रँडमास्टर चंद्रन याने स्पर्धेमध्ये अपराजित राहात एकूण ९ पैकी ७.५ गुण मिळवित खिताब आपल्या नावे केला.
India's P Magesh Chandran lifts the title in 95th edition of the prestigious Hastings International Chess Congress in England. pic.twitter.com/kIOdO7G6cS
— All India Radio News (@airnewsalerts) January 6, 2020
चंद्रन याने आठव्या फेरीत ग्रँडमास्टर दीप सेनगुप्ताचा पराभव केला होता. जीए स्टेनी ६.५ गुणासह या स्पर्धेत सहाव्या तर भारतीय महिला ग्रँडमास्टर आर वैशाली ६ गुणासह दहाव्या स्थानी राहिली.
या स्पर्धेत अन्य दोन भारतीय बुध्दीबळपटू दीप सेनगुप्ता आणि स्वयम्स मिश्रा सहा गुणांसह अनुक्रमे १३ व १४ व्या स्थानी राहिले. फ्रान्सचा रोमेन एडवर्ड ७ गुणासह दुस-या स्थानी राहिला.