नवी दिल्ली – दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात सुमारे 40 ते 50 जणांच्या घोळक्याने शिक्षक व विद्यार्थ्यांवर जबर हल्ला चढवला होता. या हिंसाचाराचे लोण आता हल्ल्याचे देशभरात पसरू लागले आहे. गुजरातमधील अहमदाबाद येथे अभाविप आणि एनएसयूआयचे कार्यकर्ते एकमेकांमध्ये भिडले. यामध्ये काही जण जखमी झाले आहेत.
#WATCH Clash between ABVP and NSUI workers in Ahmedabad, Police resorted to lathi charge to disperse the crowd. NSUI was protesting near ABVP officer over #JNUViolence when clash broke out. Around 10 people injured. (note: abusive language) #Gujarat pic.twitter.com/R7vvvYiit5
— ANI (@ANI) January 7, 2020
जेएनयूमधील हल्ल्याच्या निषेधार्थ एनएसयूआयचे कार्यकर्ते अभाविपच्या कार्यालयाबाहेर आंदोलन करत होते. यावेळी अभाविप आणि एनएसयूआयच्या कार्यकर्त्यांमध्ये मारामारी झाली. दोन्ही गटातील तरुणांनी एकमेकांवर लाठीनी हल्ला केला. वेळीच पोलिसांनी हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. तर पश्चिम बंगालमधील जाधवपूर भागात मोर्चात डाव्या पक्ष आणि भाजपा समर्थक आमनेसामने उपस्थित झाल्यानंतर पोलिसांना लाठीमार करावा लागला.
दरम्यान, जेएनयूमधील हल्लाप्रकरणी आद्यपही कोणालाही अटक न झाल्याने विरोधकांनि सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र सोडले आहे. तर बॉलिवूडनेही या हल्ल्याचा निषेध केला आहे.