बॉलीवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित ही आपल्या अभिनयासोबतच नृत्यासाठीही ओळखली जाते. आता पुन्हा एकदा माधुरी दिग्दर्शक संजय लीला भंसालीसोबत काम करताना दिसणार आहे. यापूर्वी दोघांनी “देवदास’मध्ये एकत्रित काम केले होते.
भंसाली यांच्या आगामी बहुचर्चित “हीरा मंडी’ वेब सिरीजमध्ये माधुरी सहभागी होणार असल्याची चर्चा आहे. या वेब सिरीजसाठी भंसाली यांनी माधुरीशी संपर्क केला आहे.
या सिरीजमध्ये माधुरीचा एक खास रोल असणार आहे. जर असे झाल्यास या वेब सिरीजमध्ये चाहत्यांना माधुरीचा स्पेशल डान्स अनुभवता येणार आहे. “हीरा मंडी’ हा भंसालीचा ड्रीम प्रोजेक्ट असून तो नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे.
या बिग बजेट प्रोजेक्टसाठी सोनाक्षी सिन्हा आणि हुमा कुरैशी यांच्या नावांची चर्चा झाली होती. या वेब सिरीजची कथा पाकिस्तानमधील लाहोर शहरातील एका रेड लाइट भागातील महिलांच्या परिस्थितीवर आधारित आहे.