मुंबई – बॉलीवूडमधील ‘धकधक गर्ल’ अर्थात मराठमोळी ‘माधुरी दीक्षित’ आपल्या सुंदर अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर आजही राज्य करत आहे. बॉलिवूडची ही अभिनेत्री तिच्या सौंदर्यासाठी आणि सुंदर हास्यासाठी ओळखली जाते.
बॉलिवूडची हीच धकधक गर्ल गेली दोन दशकांहून अधिक काळ रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. आजही माधुरीचा स्वतःचा असा वेगळा चाहता वर्ग आहे. आजही तिची जादू प्रेक्षकांच्या मनावर कायम आहे.
नुकतंच (दि. 15) माधुरी ने आपला 54 वाढदिवस साजरा केला. या वयातही तिचा प्रत्येक अंदाज चाहत्यांसाठी खासच असतो. तिच्या प्रत्येक अदा पाहून चाहते फिदा होता. सोशल मीडियावर विविध अंदाजातील माधुरीचे अनेक फोटो व्हायरल होत असतात.
दरम्यान, असाच एक माधुरीचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायला होत आहे. या फोटो मध्ये माधुरी दीक्षित मेकअप करताना दिसून येत आहे. फोटोत माधुरीच्या चेहऱ्यावर सुरकुत्या पडल्याचे पाहायला मिळतंय. जितकी फोटोत किंवा ऑनस्क्रीन सुंदर दिसते तितकी सुंदर ती या व्हायरल फोटोत दिसत नाही.
सध्या तिचा हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून, माधुरीचा हा फोटो खरा नसल्याचे तिच्या चाहत्यांनी म्हटले आहे. तर काहींना हा फोटो खरा वाटतोय. पण माधुरीचे वय पाहता तिच्या सौंदर्या बद्दल अनेक अंदाजा बांधले जात आहे.