यांगकून – म्यानमारमधील लष्करी संघर्षाच्या पार्श्वभूमीवर जनसामान्यांमध्ये नाराजीची भावना वाढत असतानाच देशांतील एक प्रख्यात ब्युटी क्वीनने हातात असॉल्ट रायफल घेऊन लष्कराच्या विरोधात भूमिका घेतली आहे तार तार ते असे या ब्युटी क्वीन चे नाव असून 2013 च्या ग्रँड इंटरनॅशनल ब्युटी क्वीन स्पर्धेत तिने भाग घेतला होता आणि विजय मिळवला होता.
हातात अत्याधुनिक अशी असॉल्ट रायफल घेऊन तिने लष्कराच्या विरोधात भूमिका घेतली आहे याबाबतची छायाचित्रेही तिने सोशल मीडिया वर पोस्ट केली आहेत सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या लेखात तिने म्हटले आहे क्रांती म्हणजे जणूकाही झाडावरून खाली पडणारे सफरचंद नाही आपल्याला लढावं लागेल आणि विजय मिळेपर्यंत आमची लढाई सुरूच ठेवावी लागेल पुन्हा एकदा संघर्ष करण्याची वेळ आली असून प्रत्येकाने आपल्याला उपलब्ध होईल ते हत्यार घेऊन या संघर्षात भाग घेण्याची गरज आहे.
तार तार ते हिने सोशल मीडियावर अशा प्रकारचे आवाहन केल्यानंतर लष्कराच्या विरोधात भूमिका घेणाऱ्यांची संख्या लक्षणीयरित्या वाढली आहे याच तार तार ने 2013 मध्ये ब्युटी क्वीन स्पर्धेमध्ये भाग घेतलेला असताना ही लष्कराच्या विरोधात थेट भूमिका घेतली होती लष्कराच्या विरोधात तिने त्यावेळी ठोकलेल्या जोरदार भाषणामुळे सार्या जगाने लक्ष वेधून घेतले होते तर तार ते सध्या जिम्नॅस्टिक प्रशिक्षक म्हणून काम करत आहे गेल्या काही महिन्यांच्या कालावधीमध्ये लष्करी संघर्षामध्ये 800 पेक्षा जास्त सामान्य नागरिकांचा जीव गेल्याने तिला पुन्हा एकदा लष्कराविरुद्ध संघर्ष करण्याची भूमिका घ्यावी लागली आहे