हटके भूमिकाच आवडतात…

सिनेसृष्टीतील बऱ्याच नायिकांना आलिशान घरात लाडाकोडात वाढलेल्या मुलीच्या किंवा कॉलेजगोईंग तरुणीच्या किंवा करिअरस्टिक तरुणीच्या व्यक्‍तिरेखा साकारायला आवडतात. गेला बाजार पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकांसाठी अलीकडील काळात नायिका बोलू लागल्या आहेत. या नायिकांमध्ये सहसा कुणी वयोवृद्ध स्रीची भूमिका साकारण्यास तयार होणार नाही. किंबहुना, अशा भूमिकेसाठी विचारणा झाल्यास त्याला बरेच काही ऐकवूनही दाखवतील. पण “टॉयलेट एक प्रेमकथा’ आणि दम लगा के हैशा’ यांसारख्या चित्रपटांमधून भूमी पेडणेकरला मात्र नेहमीच अशा हटके व्यक्‍तिरेखा साकारायला आवडतात.

 

View this post on Instagram

 

😁 . . . #hello #instafam #love #gratitude #saandkiaankh

A post shared by Bhumi✨ (@bhumipednekar) on

आगामी “सांड की आंख’ या चित्रपटामध्ये तिने 70 वर्षांच्या एका महिलेची व्यक्‍तिरेखा साकारली आहे. याबाबत तिला अनेकांनी खोचक प्रश्‍नही विचारले. तू कशी काय तयार झालीस असल्या भूमिकेसाठी असा सवालही विचारला. पण भूमी म्हणते, खरं सांगायचं तर मला अशा आव्हानात्मक भूमिका करायलाच आवडतात. कारण त्यासाठी खरी हिम्मत लागते. 70 वर्षाच्या महिलेची भूमिका करणे ही सोपी गोष्ट नाही. मुख्य म्हणजे ही व्यक्‍तिरेखा समाजातील लोकांच्या विचारांना प्रभावी करणारी आहे आणि मला अशाच भूमिका साकारायला आवडतात.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)