मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू आणि भूमी पेडणेकर यांच्या आगामी “सांड की आँख” सिनेमाचा नुकताच ट्रेलर प्रदर्शित झाला होता, यामध्ये तापसी आणि भूमीचा एक वेगळ्याच लुक दिसून येत आहे. उत्तर प्रदेशमधल्या जोहरी गावात राहणाऱ्या वृद्ध शार्पशूटर ‘चंद्रो तोमर’ आणि ‘नणंद प्रकाशी तोमर’ यांच्या जीवनावर आधारित हा बायोपिक आहे. यातच आता या चित्रपटातील नवे गाणे प्रदर्शित झाले आहे.
दरम्यान, या आगामी चित्रपटातील आसमां हे गाणं प्रदर्शित झालं आहे. हे गाणं, ८६ वर्षांच्या गानसम्राज्ञी आशा भोसले यांनी आपल्या मधुर आवाजात गायिले आहे. आसमां या गाण्याला विशाल मिश्राने म्युझिक दिलेलं आहे. तर या गाण्याचे लिरिक्स राज शेखर यांनी लिहिलं आहे.
Here it is… our labour of love …
But this one is dedicated to all the mothers….#SaandKiAankh https://t.co/UPViMsyTMB— taapsee pannu (@taapsee) September 23, 2019
या चित्रपटाचे दिग्दर्शक तुषार हिरानंदानी आणि निर्माता अनुराग कश्यप आहे. सांड की आंख हा चित्रपट येत्या २५ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे. दरम्यान, चंद्रो तोमर या 87 वर्षांच्या आहेत तर नणंद प्रकाशी तोमर या 82 वर्षांच्या असून सर्वत्र त्यांना ‘रिव्हॉल्वर दादीं’ म्हणून ओळखलं जातं.