फॅन्सी कपड्यांवर खर्च कशाला?

सर्वसामान्यांमध्ये बॉलीवूडमधील तारे-तारकांच्या पेहरावाविषयी मोठं अप्रूप असतं. किंबहुना, हे कलाकारच फॅशनविश्‍वाचे ट्रेंड सेटर असतात. एखाद्या नायिकेने एखादा ड्रेस घातला आणि तो हटके , फंकी आणि आकर्षक असेल तर लागलीच तरुणींकडून तशा प्रकारच्या ड्रेसची मागणी होऊ लागतेकिंवा फॅशन विश्‍वातील निर्माते डिट्टो तसेच ड्रेस बाजारात आणतात आणि ती फॅशन रुढ होऊन जाते. पण वाचकहो, एखाद्या नायिकेला फॅन्सी कपड्यांवर खर्च करणे आवडत नाही असे सांगितले तर…? तुमचा विश्‍वास बसणार नाही ना? पण हे खरं आहे. ही अभिनेत्री दुसरी-तिसरी कोणी नसून ती आहे आपली मराठमोळी राधिका आपटे.

कोणत्याही विषयावर आपले मत स्पष्टपणाने मांडणारी अभिनेत्री म्हणून राधिकाची ओळख आहे. अलीकडेच राधिकाने आपल्या विवाहातील काही आठवणी शेअर केल्या आहेत. त्यामध्ये तिनेएक धक्‍कादायक खुलासा केला आहे. त्यानुसार राधिकाने आपल्या विवाहामध्ये तिच्या आजीने दिलेली जुनी साडी परिधान केली होती म्हणे! ही साडी इतकी जुनी होती की तिच्यावर काही छिद्रेही पडलेली होती. मात्र राधिकाचा आपल्या आजीवर खूप जीव असल्यामुळे आयुष्यातील सर्वांत महत्त्वाच्या क्षणी तिने आजीची आठवण म्हणून तिची साडी नेसणे पसंत केले!

राधिका पुढे सांगते की, तिला फॅन्सी कपड्यांवर खर्च करणे आजिबात आवडत नाही. अशा या राधिकाने आपल्या लग्नाच्या रिसेप्शनसाठीही “साधा’च ड्रेस घेतला होता. त्याची किंमत होती फक्‍त 10 हजार रुपये! बेनेडिक्‍ट टेलर या लंडनमधील संगीतकाराशी विवाह केला आहे.

 

View this post on Instagram

 

🖤 Saree- @raw_mango Jewellery- @karishma.joolry Styled by- @who_wore_what_when Photography-@anurag_kabburphotography

A post shared by Radhika (@radhikaofficial) on

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)