मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रावर पॉर्न व्हिडिओ बनविल्याप्रकरणी आरोप असून याप्रकरणी राज पोलिसांच्या ताब्यात आहे. पोलिसांच्या माहितीनुसार राज कुंद्रा विरोधात पुरावे मिळाले आहेत. असे असाताना राज कुंद्राच्या प्रॉडक्शन हाऊसकडून ऑफर आल्याचा खुलासा मराठी अभिनेत्री मनिषा केळकरने केला आहे. हा खुलासा तीने एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केला आहे.
मनिषा केळकर म्हणाली की, “मला एका कास्टिंग डायरेक्टरने ऑफर दिली होती. राज कुंद्राचा हा प्रोजेक्ट आहे आणि त्यासाठी काही फोटो, व्हिडीओ शूट करणार आहोत, असे त्यांनी सांगितलं होते. त्यावेळी अॅप लाँच झाला नव्हता. फोटोग्राफ्स आणि व्हिडीओ कशासाठी किंवा नेमका काय प्रोजेक्ट आहे ते त्यांना विचारले असता त्यांच्याकडून मला समाधानकारक उत्तर मिळाले नाही. मला त्यात काही तथ्य वाटले नाही, म्हणून मी त्यांना नकार दिला. त्यानंतर त्यांचा पुन्हा मला कधी कॉल आला नाही. साधे फोटोशूट्स असतील असे त्यांनी सांगितले होते. न्यूडिटी वगैरेचा उल्लेख त्यांनी केला नव्हता.”
राजने कुंद्राने पॉर्न चित्रफित निर्माण करून त्याच्या प्रसारणासाठी 2019 मध्ये आर्म्स प्राईम मीडिया नावाने कंपनी स्थापन केली होती. या कंपनीच्या माध्यमातून पॉर्न चित्रफिती प्रसारणासाठी तयार करण्यात आलेले हॉटशॉट्स नावाचे ॲप्लिकेशन लंडनस्थित केनरीन कंपनीला विकले. मात्र या ॲप्लिकेशनबाबतची बरीच कामे राज कुंद्रामार्फतच करण्यात येत होती.