पर्यावरण रक्षणासाठी लंडन, न्युयॉर्कला उग्र निदर्शने

लंडन – जागतिक तापमान वाढ आणि वातावरणातील बदलांकडे जगाचे लक्ष वेधण्यासाठी पर्यावरणवाद्यांनी आज लागोपाठ चौथ्या दिवशी जगाच्या विविध भागात उग्र निदर्शने केली. न्युयॉर्कला मध्यवस्तीत या निदर्शकांनी वाहतूक बंद पाडली तर लंडनला निदर्शक चक्क विमानावर चढले आणि त्यांनी तेथून निदर्शने करीत पर्यावरणाच्या ऱ्हासाकडे लोकांचे लक्ष वेधले.

न्युयॉर्कला मध्यवस्तीतील रस्त्यांवर अचानक असंख्य कार्यकर्ते घुसले आणि त्यांनी तेथील वाहतूक रोखून धरली. रस्त्यावर त्यांनी अडथळे उभारले आणि आपले भविष्य वाचवा अशा घोषणा देत त्यांनी एकच राळ उडवून दिली. त्यांना हटवून वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांची मात्र तेथे बरीच तारांबळ उडाली. लंडन शहराच्या विमानतळावर निदर्शक ब्रिटीश एअरवेजच्या विमानावरच चढले होते.

त्यामुळे ऍमस्टरडॅम कडे जाणाऱ्या या विमानातील प्रवाशांना अन्य विमानाने तिकडे रवाना करावे लागले. दुसऱ्या एका घटनेत लंडन ते डबलीन हे विमान उड्डाणाच्या स्थितीत असतानाच विमानातील निदर्शक एकदम उठले आणि त्यांनी तेथे पर्यावरण रक्षण या विषयावरील व्याख्यान तेथे आयोजित करून अनोख्या पद्धतीने त्यांनी या समस्येकडे जगाचे लक्ष वेधले.

या प्रकारामुळेही विमानाच्या उड्डाणाला विलंब झाला. काल गुरूवारीही निदर्शकांनी लंडन शहराचा विमानतळच बंद पाडण्याचा प्रयत्न केला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.