विश्रांतवाडी (प्रतिनिधी) : लोकविकास संघटनेच्यावतीने प्रभाग क्रमांक एकमधील विश्रांतवाडी, धानोरी परिसरातील गरजूंना धान्य व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. या उपक्रमासाठी नगरसेवक अनिल (बॉबी) टिंगरे, सिद्धिविनायक ट्रस्ट, सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ पानगावे यांचे विशेष सहकार्य लाभले.
संस्थेच्या अध्यक्षा छायाताई उकारडे, अभिजीत उकारडे, अशोक भोसले, शंकर धाकतोडे, जालिंदर उकारडे, नागेश देडे, सागर सकट यांनी सोशल डिस्टनसिंगचे पालन करत वेगवेगळ्या ठिकाणी वाटप केले.