नवी दिल्ली, दि. 21 – लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांना करोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यांना दिल्लीतील एम्स रूग्णालयातील कोविड सेंटर मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थीर असून ते उपचारांना चांगला प्रतिसाद देत आहेत अशी माहिती रूग्णायाच्या सूत्रांनी दिली.
58 वर्षीय बिर्ला यांना 19 मार्च रोजी करोनाची लागण झाली आहे. त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांची करोना चाचणी घेण्यात आली त्यात त्यांना करोना झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर एम्स केंद्रात दाखल करण्यात आले. सध्या लोकसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे.
त्या कामकाजात बिर्ला हे नियमीतपणे सहभागी झाले होते. संसद अधिवेशन काळात संसद भवन परिसरात करोनाच्या संबंधातील सर्व दक्षता घेऊनही काहीं खासदार या संसर्गाने बाधित झाले आहेत.