नवी दिल्ली – अदानीच्या घोटाळ्यावरून लोकसभेत विरोधकांचा गदारोळ सुरू असतानाच आज कोणत्याही चर्चेविना वित्त विधेयक 2023 मंजुर करण्यात आले. यातील करविषयक तरतूदींवर कोणतीही चर्चा न होता त्याला मान्यता देण्यात आली. या वित्त विधेयकात नवीन 20 सुधारणा करण्यात आल्या असून या सुधारणांसह हे वित्तविधेयक मंजूर करण्यात आले आहे.
सभागृहात या विधेयकाचा निर्णय घेतला जात असतानाहीं विरोधकांच्या अदानींच्या विरोधातील घोषणा सुरूच होत्या. विरोधी सदस्यांनी आज अदानी प्रकरणावर सभागृहात फलकही फडकावले.
Rahul Gandhi Disqualified : अगोदर आजी आणि आता नातू….48 वर्षांनंतर गांधी कुटुंबाला धक्का
घोषणाबाजी सुरूच राहिल्याने सभापतींनी सभागृहाचे कामकाज सोमवारपर्यंत तहकूब केले. पण तत्पुर्वी वित्त विधेयक मंजुरीचा कार्यभाग उरकण्यात आला. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्यात आजपर्यंत एक दिवसही पुर्ण कामकाज होऊ शकलेले नाही.