मुंबई – बडे मियाँ छोटे मियाँ या चित्रपटात अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट अली अब्बास जफर दिग्दर्शित करत आहे. चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली असून अक्षय कुमार चित्रपटाच्या सेटवर जखमी झाल्याची वृत्त समोर आली आहे. सध्या स्कॉटलंडमध्ये चित्रपटाचे शूटिंग सुरू आहे.
अक्षय कुमार नुकताच अमेरिकेत द एंटरटेनर नावाचा शो करून परतला. त्यानंतर तो बडे मियाँ छोटे मियाँच्या शूटिंगसाठी गेला. आता तो सेटवर जखमी झाल्याची बातमी समोर आली आहे. टायगर श्रॉफ आणि अक्षय कुमार स्कॉटलंडमध्ये चित्रपटाचे शूटिंग करत होते. हाय ऑक्टेन ऍक्शन सीन करताना अक्षय कुमारला दुखापत झाली.
एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार अक्षय कुमारला स्टंट स्वतः करायचा होता आणि त्याने बॉडी डबल घेण्यास नकार दिला. सेटवर ऍक्शन सीन करताना तो जखमी झाला. त्याला गंभीर दुखापत झाली नसल्याचा दावाही अहवालात करण्यात आला आहे. केवळ त्याच्या त्याच्या गुडघ्यावर एक जखम झाली आहे. यामुळे त्या सिनचे शूट अर्धवट ठेवण्यात आल्याचे देखील समजते.
अक्षय कुमारला विश्रांती घेण्यास सांगण्यात आले आहे.या चित्रपटात अक्षय कुमार, सोनाक्षी सिन्हा, मनुषी छिल्लर देखील दिसणार आहेत. चित्रपटाच्या सेटवरील पूर्वीचे फोटो शेअर केले होते. नुकतेच सोनाक्षी सिन्हाने चित्रपटात काम करण्याबाबत भाष्य केले होते. ऍक्शनसह या चित्रपटात अक्षयची जबरदस्त कॉमेडी देखील प्रेक्षकांना पाहायला