Lok Sabha Election | Criminal Cases : अलीकडेच मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी लोकसभा निवडणुकीच्या 2024 च्या तारखा जाहीर केल्या. 19 एप्रिलपासून सुरू होणाऱ्या आणि 1 जून रोजी संपणाऱ्या 7 टप्प्यांत निवडणुका होतील. लोकसभा निवडणुकीचे 2024 चे निकाल 4 जून रोजी जाहीर होतील.
लोकसभा निवडणूकीच्या काळात सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. काही राजकीय पक्षांनी आपल्या उमेदवारांच्या याद्या देखील जाहीर केल्या आहेत. यंदा भाजपकडून 400 पार चा नारा दिला आहे. भाजपने देखील तिसऱ्यांदा आम्हीच सत्तेत येऊ असा दावा केला आहे. । Lok Sabha Election 2024
तर दुसरीकडे, भाजपला पराभूत करु असा विश्वास विरोधकांनी व्यक्त केला आहे. यावेळी लोकसभा निवडणुकीत सुमारे 97 कोटी लोक मतदान करणार आहेत. त्यामध्ये 1.82 कोटी प्रथम मतदार असणार असून, 18 ते 21 वयोगटातील 21.50 कोटी मतदार आहेत, तर 48 हजार तृतीयपंथी मतदार आहेत. तसेच, पुरुषांपेक्षा महिला मतदारांचे प्रमाण अधिक असल्याचं देखील यावेळी सांगण्यात आलं आहे.
7 टप्प्यात लोकसभा निवडणूक होती. महाराष्ट्रात दुसऱ्या टप्प्यात लोकसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत. पहिल्या टप्प्यातील निवडणूक 19 एप्रिलला होणार असून 4 जूनला मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात 26 एप्रिलला मतदान होणार आहे. तसेच 4 जूनला सर्व देशात मतमोजणी होईल.
येत्या 19 तारखेला पहिल्या टप्प्यासाठी मतदान होत आहे. यात 21 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मिळून 102 जागांचा समावेश आहे. या सर्व जागांवर 19 एप्रिल रोजी मतदान केलं जाणार आहे. या निवडणुकीसाठी 1625 उमेदवार रिंगणात आहेत. या सर्व उमेदवारांची कुंडली उघड झाली आहे.
यातील 252 उमेदवार गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत. तर 450 उमेदवार करोडपती आहेत. विशेष म्हणजे या सर्वांमध्ये काँग्रेसचे नेते कमलनाथ यांचे चिरंजीव नकुलनाथ हे सर्वाधिक श्रीमंत उमेदवार ठरले आहेत. एडीआरने 1625 उमेदवारांपैकी 1618 उमेदवारांच्या शपथपत्रांचं विश्लेषण केलं आहे.
त्यानंतर त्यांनी एक रिपोर्ट जारी केला आहे. त्यानुसार 102 जागांवरील 42 जागा अशा आहेत की जिथे तीनहून अधिक उमेदवारांवर गुन्हे दाखल आहेत. या रिपोर्टनुसार 1618 उमेदवारांपैकी 16 टक्के म्हणजे 252 उमेदवारांवर गुन्हे दाखल आहेत. तर 10 टक्के म्हणजे 161 उमेदवारांवर गंभीर गुन्हे दाखल आहेत.
पहिल्या टप्प्यात बिहारच्या चार जागांवर मतदान होणार आहे. यातील आरजेडीच्या सर्व चारही उमेदवारांवर गुन्हे दाखल आहेत. तर डीएमकेच्या 22 पैकी 13, सपाच्या 7 पैकी 3, टीएमसीच्या 5 पैकी 2, भाजपच्या 77 पैकी 28, एआयएडीएमकेच्या 36 पैकी 13, काँग्रेसच्या 56 पैकी 19 आणि बसपाच्या 86 पैकी 11 उमदेवारांवर गुन्हे दाखल आहेत.
आरजेडीच्या चारपैकी दोन, डीएमकेच्या 22 पैकी 6, सपाच्या सातपैकी दोन, टीएमसीच्या पाच पैकी एका उमेदवारावर अत्यंत गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. तर बीजेपीच्या 14, एआयएडीएमकेच्या 6, काँग्रेसच्या 8 आणि बसपाच्या 8 उमेदवारांवरही अत्यंत गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. । Lok Sabha Election 2024
कोणत्या टप्यात कधी निवडणुका होणार :
पहिला टप्पा -19 एप्रिल
दुसऱ्या टप्प्यात – 26 एप्रिल
तिसरा टप्पा – 7 मे
चौथा टप्पा – 13 मे
पाचवा टप्पा – 20 मे
सहावा टप्पा – 7 मे
सातवा टप्पा – 1 जून
देशात 97 कोटी मतदार :
आपल्या देशात 97.8 कोटीहून अधिक मतदार आहेत. त्यात 49.7 कोटी पुरुष आणि 47.1 कोटी महिला मतदारांचा समावेश आहे. तसेच 1.82 कोटी नवीन मतदार आहेत. यंदा 82 लाख प्रौढ मतदार मतदान करणार आहेत. 48 हजार तृतीयपंथीयही मतदानाचा हक्क बजावणार आहेत, अशी माहिती राजीव कुमार यांनी दिली.
महाराष्ट्रात मतदान कधी आणि कुठे ? । Lok Sabha Election 2024
पहिला टप्पा – 19 एप्रिल – रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदीया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर
दुसरा टप्पा 26 एप्रिल – बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ – वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी
तिसरा टप्पा 7 मे – रायगड, बारामती, धाराशीव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी- सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले
चौथा टप्पा 13 मे – नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड
पाचवा टप्पा 20 मे – धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबईतील सहा मतदारसंघ । Lok Sabha Election 2024