मांजरी-प्रत्येकाची इच्छा असते आपलं लग्न चांगल्या प्रकारे व्हावं, पण सध्या करोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे घरगुती पद्धतीने अगदी घरातल्या घरात लग्न करावं लागतं. आज दिनांक १२.०५.२०२० रोजी सिद्धिविनायक प्राईड, पुणे सोलापूर रोड या ठिकाणचे रहिवासी चि. नितीन राऊत व शिरूर येथील रहिवासी असणाऱ्या चि.सौ.का. उर्मिला यांचा शुभविवाह सिद्धिविनायक पाईड येथील राहत्या फ्लॅटमध्ये अगदी मोजक्या कुटुंबातील सहा सदस्याच्या उपस्थित पार पडला या लग्नाची पूर्वकल्पना मांजरी गावचे सरपंच शिवराज घुले यांना होती.
त्यांनी या नवधूवरांना एक वेगळ्या पद्धतीने शुभेच्छा देण्याचे ठरवले. आज दुपारी १२.३० वाजता यांचा विवाह संपन्न झाला. विवाह संपन्न झाल्यानंतर त्यांना फ्लॅटचा गॅलरीमध्ये बोलावून त्यांना एक अतिशय सुंदर पद्धतीने गाणं वाजवून शुभेच्छा देण्यात आल्या. शुभआशिर्वाद सरपंच शिवराजआप्पा घुले यांनी दिले. या अचानक आणि अनपेक्षित शुभेच्छांमुळे हे नव दांपत्य अगदी भारावून गेले होते. अशा प्रकारे एखाद्याचा आनंद द्विगुणीत करण्याचे काम मांजरी गावचे सरपंच शिवराज घुले हेच करू शकतात अशी भावना यावेळी त्यांच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.
या शुभ विवाह साठी मांजरी गावचे सरपंच शिवराज घुले यांच्यासोबत सिद्धिविनायक पेट्रोलियमचे सागरशेठ रुकारी, ग्रामपंचायत सदस्य प्रमोद कोद्रे, ग्रामपंचायत सदस्य समीर घुले, सामाजिक कार्यकर्ते बबन जगताप, गणेश गायकवाड, अमित गुंड, विशाल घुले, सेक्रेटरी नितीन चौधरी, ग्रामपंचायत कर्मचारी व सिद्धिविनायक पेट्रोलियमचे कर्मचारी यांनी सोशल डिस्टन्स पाळून टाळ्या वाजवून उपस्थित शुभेच्छा दिल्या…