सोमेश्वरनगर- शेतकऱ्यांची दोन लाखा रुपयांपर्यंतची सरसकट कर्जमाफी करण्याच्या शासनाच्या निर्णयाचे सोमेश्वरनगर (ता. बारामती) परिसरात फटाके फोडून व पेढे वाटून स्वागत करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी व शिवसेना पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन शासनाच्या या निर्णयाचे स्वागत केले.
याप्रसंगी सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, शिवसेना बारामती प्रमुख संभाजी शिंदे, विभाग प्रमुख बंटी गायकवाड, सदस्य निलेश गायकवाड, युवा कार्यकर्ते ऋषी गायकवाड, अजिंक्य सावंत, गणेश सावंत, हेमंत गायकवाड, सुखदेव शिंदे, बाळासाहेब शिंदे, प्रकाश मोकाशी, सुहास गायकवाड यांच्यासह परिसरातील शेतकरी व मान्यवर उपस्थित होते.