लंडन – महंमद सलाहने केलेल्या दोन गोलच्या जोरावर इंग्लिश प्रीमिअर लीग फुटबॉल स्पर्धेत लिव्हरपूलने मॅंचेस्टर युनायटेडचा 4-0 असा दणदणीत पराभव केला. या विजयाच्या जोरावर लिव्हरपूलने या स्पर्धेच्या गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले.
या सामन्यात लिव्हरपूलकडून सलाहने 22 व्या व 85 व्या मिनिटाला गोल केले. त्याला साथ देताना लुइझ डियाझने 5 व्या, तर सादिओ माने याने 68 व्या मिनिटाला गोल केला. या विजयासह लिव्हरपूलचे या स्पर्धेत आतापर्यंत झालेल्या 32 सामन्यांत 76 गुण झाले आहेत.