तळेगाव दाभाडे, (वार्ताहर) – वाहन क्रमांकावरून स्थानिकांची फसवणूक करून टोल आकारणी केली जात आहे. ती त्वरित थांबवावी. अन्यथा सोमवारी (दि. १०) टोल नाका बंद करण्यात येईल, असा इशारा आमदार सुनील शेळके यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून पत्रकाद्वारे दिला आहे.
मावळ तालुक्यामध्ये वर्सोली व सोमाटणे असे दोन टोलनाके आहेत. स्थानिक पातळीवर काम करताना अनेकांना या टोल नाक्यावरून ये-जा करावी लागते. या टोल नाक्यांवरून जाताना व येताना स्थानिकांना टोल माफ आहे. तरीही वाहनाच्या क्रमांकावरून फास्टट्रॅगद्वारे टोल वसुली केली जात असल्याच्या अनेक नागरिकांनी तक्रारी आहेत.
स्थानिकांची टोल वसुली बंद करावी. त्यांच्याकडून कोणत्याही स्वरुपात टेल आकारणी करु नये, अन्यथा १० जून रोजी हे टोलनाके बंद करण्यात येईल, असा इशारा आमदार सुनील शेळके यांनी टोल प्रशासनाला दिला आहे.