Sai Tamhankar And Swapnil joshi| ‘दुनियादारी’ चित्रपटाच्या मोठ्या यशानंतर या चित्रपटाच्या सिक्वेलची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. यातच आता पुन्हा एकदा या चित्रपटाची चर्चा रंगली आहे. २०१३ साली प्रदर्शित झालेला हा सिनेमा आता पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येण्याची शक्यता आहे. नुकतेच अंकुश चौधरी, सई ताम्हणकर, स्वप्नील जोशी हे कलाकार एका सिनेमासाठी एकत्र आल्याचे पाहायला मिळाले.
समोर आलेल्या फोटोत अंकुश चौधरी, सई ताम्हणकर, स्वप्नील जोशी, संजय जाधव यांची टीम एकत्र आल्याचे दिसत आहे. या चित्रपटाचे नाव आणि इतर काही गोष्टी गुलदस्त्यात ठेवण्यात आल्या आहेत. मात्र तरी अंकुश चौधरी, सई ताम्हणकर, स्वप्नील जोशी, संजय जाधव यांची टीम पाहून अनेकांनी दुनियादारी २ सिनेमा येणार असल्याची शंका व्यक्त केली आहे.
चित्रपटाची पूर्वतयारी आता सुरु झाली असून ही टीम प्रेक्षकांना ११ वर्षांनंतर भेटीस येणार असल्याची चर्चा आहे. या नव्या चित्रपटाचे दिग्दर्शक संजय जाधव आहेत. तर या सिनेमाचे निर्माते स्वाती खोपकर, अमेय खोपकर, नानूभाई जयसिंघानी आणि निनाद बत्तीन आहेत. Sai Tamhankar And Swapnil joshi|
View this post on Instagram
दरम्यान, ११ वर्षांपूर्वी आलेला दुनियादारी सिनेमा चांगलाच गाजला होता. या सिनेमात अंकुश चौधरी, सई ताम्हणकर, स्वप्नील जोशी यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. या. सिनेमातील श्रेयस, शिरीन, सुरेखा आणि दिग्या ही पात्र चांगलीच हिट झाली. या तिन कलाकारांची जोडी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर येण्यास सज्ज होणार आहे. Sai Tamhankar And Swapnil joshi|
हेही वाचा:
सुपर स्टार विजय सेतुपतीने त्याच्यापेक्षा लहान अभिनेत्रीशी रोमँटिक सीन करण्यास दिला ‘नकार’