Bollywood News । बॉलीवूडमधील चित्रपटातील नायक आणि नायिका यांच्या वयातील फरक हा अनेकदा चर्चेचा मुद्दा बनतो. इंडस्ट्रीतील टॉप पुरुष स्टार्स अनेकदा त्यांच्या अर्ध्या वयाच्या अभिनेत्रींसोबत चित्रपटांमध्ये रोमान्स करताना दिसले आहेत. असे केवळ बॉलीवूडमध्येच नाही, तर देशभरातील जवळपास सर्वच चित्रपट उद्योगांमध्ये आणि आघाडीच्या नायकांमध्ये आढळते.
मात्र यावर आता साऊथ सुपर स्टार विजय सेतुपतीने आपली भूमिका मांडली आहे. विजयने सांगितले आहे की,’काही काळापूर्वी त्याने मुख्य भूमिकेत असलेल्या अभिनेत्रीसोबत रोमँटिक भूमिका करण्यास नकार दिला होता. कारण म्हणजे अभिनेत्री त्याच्यापेक्षा खूपच लहान होती.
तो म्हणाला, ‘डीएसपी चित्रपटात क्रितीसोबत काम करण्याची ऑफर मी नाकारली होती. मी ‘अपेन्ना’ (2021) मध्ये तिच्या वडिलांची भूमिका साकारली होती, ज्याबद्दल कदाचित या निर्मात्यांना माहिती नसेल. ‘अपेन्ना’मधील एका सीनमुळे क्रिती खूप घाबरली होती. सीन शूट करताना मला तिच्या खऱ्या वडिलांप्रमाणे वागव असं मी तिला सांगितलं. ती माझ्या मुलापेक्षा थोडी मोठी आहे. त्यामुळे मी नंतरच्या चित्रपटात तिच्यासोबत रोमँटिक सिन करण्यास नकार दिला आहे.
विजय सेतुपतीबद्दल सांगायचे तर, तो वर्षाच्या सुरुवातीला श्रीराम राघवनच्या हिंदी-तमिळ चित्रपट ‘मेरी ख्रिसमस’मध्ये दिसला होता. या चित्रपटात तो कतरिना कैफसोबत रोमान्स करताना दिसला होता. गेल्या वर्षी शाहरुख खानच्या ब्लॉकबस्टर ‘जवान’मध्ये सेतुपतीने खलनायकाची भूमिका साकारली होती.