पुणे – विभागातील पुणे शहरातील दोन रक्तपेढ्यांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत. रक्तपेढीच्या तपासणीत त्रुटी आढळल्याने ही कारवाई करण्यात आली. आतापर्यंत वेगवेगळ्या दहा रक्तपेढ्यांना कारणे दाखवा’ नोटीस बजावण्यात आली आहे.
विभागातील पुण्यासह सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यांमध्ये 97 रक्तपेढ्या आहेत. त्यापैकी आतापर्यंत 23 रक्तपेढ्यांची तपासणी करण्यात आली.
त्यातील 10 रक्तपेढ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्याचे एफडीए पुणे विभागाचे सहआयुक्त (औषध) एस. बी. पाटील यांनी दिली.