बीजिंग – एकेकाळी देशाच्या सर्वोच्च नेतृत्वाच्या भूमिकेसाठी राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या विरोधात प्रबळ दावेदार असलेले चीनचे माजी पंतप्रधान ली केकियांग यांचे शुक्रवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
68 वर्षीय ली यांना गुरुवारी हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांना वाचवण्याचे सर्व उपाय अयशस्वी झाल्यानंतर 12:10 वाजता शांघाय येथे त्यांचे निधन झाले. ते विश्रांतीसाठी पूर्व चिनी महानगरात होते, असे सरकारी दैनिकाने म्हटले आहे.
ली हे एके काळी चीनच्या सत्ताधारी कम्युनिस्ट पार्टीचे प्रमुखपदासाठी शी यांच्या विरोधात स्पर्धक होते. परंतु नंतर ते मार्च 2013 ते मार्च 2023 या कालावधीत प्रीमियर म्हणून क्रमांक दोनवर स्थिरावले होते. ते एक लक्षणीय अर्थशास्त्रज्ञ होते. चीनला जगातली दुसरी मोठी अर्थव्यवस्था म्हणून नावारुपाला आणण्यात केकियांग यांचे मोठे योगदान होते.
त्याचे शी जिनपिंग यांच्याशी ताणलेले संबंध होते. तरिही केकियांग यांनी त्यांच्या काळात अध्यक्ष म्हणून सत्तेवर आपली पकड स्थिरपणे मजबूत केली आणि पक्षाचे संस्थापक माओ झेडोंग नंतरचे सर्वात शक्तिशाली चीनी नेते म्हणून उदयास आले.